अंतर नक्की कुठले सामाजिक की शारीरिक
अंतर नक्की कुठले सामाजिक की शारीरिक... प्रा. अलोक पवार सध्या या कोरोना काळात कोरोनाची लागण होऊ नये म्हणून दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवून राहा असे सांगितले जाते आहे. आणि हे अंतर ठेवताना इंग्रजी मध्ये Social Distance व त्याचे मराठी मधून भाषांतर म्हणजेच सामाजिक अंतर ठेवा असे म्हणले वापरले जाते आहे. म्हणजे दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे खरेच अत्यावश्यक आहे. ज्याची अत्यंत गरज देखील आहे. पण त्याच्या पुढे सामाजिक हा शब्द वापरणे अत्यंत चुकीचा वाटतो. मागे आपल्या माननीय पंतप्रधान यांनी लॉकडाउन जाहीर केल्यावर टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवा लावा असे नानाविविध कार्यक्रम घेतले. मानसशास्त्रीय दृष्ट्या हे सर्व उपक्रम अतिशय स्तुत्य होते कारण प्रत्येक घरातील व्यक्ती यामध्ये सहभागी होऊन दुसऱ्याला जणू सांगत होता की आपण सर्व एकसाथ आहोत. यावेळी गरीब - श्रीमंती ची भावनाच जणू नव्हती कारण सर्व स्तरावरून सहभागी झाले होते. यावेळी आपण एक सामाजिक बांधिलकी जपली होती असे म्हणायलाया हरकत नव्हती. आपण त्या कोरोना योध्यांंच्या समर्थनार्थ हे सर्व केले. मी इथे सामाजिक बांधिलकी शब्द वापरतो आहे. जी आपण आपल्या आप...