Posts

अंतर नक्की कुठले सामाजिक की शारीरिक

Image
  अंतर नक्की कुठले सामाजिक की शारीरिक... प्रा. अलोक पवार सध्या या कोरोना काळात कोरोनाची लागण होऊ नये म्हणून दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवून राहा असे सांगितले जाते आहे. आणि हे अंतर ठेवताना इंग्रजी मध्ये Social Distance व त्याचे मराठी मधून भाषांतर म्हणजेच सामाजिक अंतर ठेवा असे म्हणले वापरले जाते आहे. म्हणजे दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे खरेच अत्यावश्यक आहे. ज्याची अत्यंत गरज देखील आहे. पण त्याच्या पुढे सामाजिक हा शब्द वापरणे अत्यंत चुकीचा वाटतो.  मागे आपल्या माननीय पंतप्रधान यांनी लॉकडाउन जाहीर केल्यावर टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवा लावा असे नानाविविध कार्यक्रम घेतले. मानसशास्त्रीय दृष्ट्या हे सर्व उपक्रम अतिशय स्तुत्य होते कारण प्रत्येक घरातील व्यक्ती यामध्ये सहभागी होऊन दुसऱ्याला जणू सांगत होता की आपण सर्व एकसाथ आहोत. यावेळी गरीब - श्रीमंती ची भावनाच जणू नव्हती कारण सर्व स्तरावरून सहभागी झाले होते. यावेळी आपण एक सामाजिक बांधिलकी जपली होती असे म्हणायलाया हरकत नव्हती. आपण त्या कोरोना योध्यांंच्या समर्थनार्थ हे सर्व केले. मी इथे सामाजिक बांधिलकी शब्द वापरतो आहे. जी आपण आपल्या आप...

मंदिरे किंवा कोणतीही धार्मिक स्थळे उघडण्याबाबत मला काय वाटते?

मंदिरे किंवा कोणतीही धार्मिक स्थळे उघडण्याबाबत मला काय वाटते ? सध्या आपण संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीशी लढतो आहे. याच बरोबर आपल्याला आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत जसे की अन्न, वस्त्र, निवारा यादेखील या कठीण परिस्थितीमध्ये सहजरित्या मिळणे अवघड होऊन बसले आहे. याच मूलभूत गरजा पुढे उत्तम आरोग्य आणि उत्तम शिक्षण असे वाढलेले दिसते. मी सामान्य घरातील नागरिकांच्या विषयीच बोलतो आहे फक्त. याच सामान्य लोकांच्या नोकऱ्या देखील सध्या शाबूत नाहीत. किंवा भविष्यात त्या शाबूत राहतील याची देखील कोणतीही हमी नाही. या परिस्थितीमध्ये निदान घरातील आर्थिक भार व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रात लॉकडाऊन टप्या टप्याने खोलण्यात आले. काही कामकरी वर्गाला प्रथम प्राध्यान्य देऊन आज बहुतांशी कामगार वर्ग रोज घराच्या बाहेर पडत आहे. हा बाहेर कामाला पडणारा कामगार वर्ग आज बाहेर सुरक्षित आहे का? अजिबात नाही; तरीही तो कामासाठी घरातल्या दोन वेळच्या जेवणाची सोय करता यावी म्हणून तो घराच्या बाहेर पडतोय. काही वर्गाला घरीच बसुन राहावे लागत आहे, घरी लहान मुले अडकुन राहिली आहेत त्यांच्यावर लक्ष द्यायचे आहे, कोरोना...